फलटण प्रतिनीधी:- आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साखरवाडी, विडणी व राजाळे येथे बीएसएफ व स्थानिक पोलिसांचे सशस्त्र पथसंचलन करण्यात आले.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत आगामी लोकसभेची आचारसंहिता सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था चोख राहण्यासाठी व निवडणुका निरपेक्ष व निर्भय वातावरणात होण्यासाठी पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक आचल दलाल, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे सशस्त्र पथसंचलन घेण्यात आले.
केंद्रीय राखीव तुकड्यासोबत फलटण ग्रामीण पोलिसांनी मोठ्या लोकसंख्या असलेल्या साखरवाडी, विडणी व राजळे या गावांमध्ये सशस्त्र पथसंचलन केले. यावेळी पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, पोलिस उपनिरीक्षक पाटील गोपाळ बदाणे तसेच केंद्रीय राखीव तुकडी बीएसएफचे पोलिस निरीक्षक थंडर बोल्टपीएसआय दत्ताराम केंद्रीय राखीव दलाचे ७० जवान व स्थानिक पोलिस स्टेशनचे ३० पोलिस कर्मचारी व ३० होमगार्ड सहभागी होते.