सातारा, दि. १७ : दरवर्षी १ ते ७ सप्टेबर रोजी राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह साजरा केला जातो. या सप्ताहासाठी एक घोषवाक्य सेट केले जाते.” सर्वांसाठी पौष्टीक आहार” ही या वर्षाची थीम आहे. परिचारीका प्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी आहाराचे प्रत्यक्षिक व प्रदर्शन केले तसेच पूरक आहार ,कुपोषित बालकाचा आहार , गरोदर व स्तनदा मातेचा आहार मधुमेह व उच्च रक्तदाबावर प्रतिंबधनात्मक आहार या विषयी जनजागृती केली. या कार्यक्रमासाठी परिक्षक म्हणुन जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. युवराज करपे, अतिरीक्त जिल्हाचिकीत्सक डॉ. राहुलदेव खाडे व डॉ संजीवनी शिंदे होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक उपस्थित होते.