सातारा दि. 21 : माजी सैनिक,माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना शालांत परिक्षा 60 टक्के गुणाने उत्तीर्ण होऊन पदव्युत्तर शिक्षण घेई पर्यंत शिष्यवृत्ती व विद्यावेतन योजने अंतर्गत आर्थिक मदत देण्यात येते. तरी सातारा जिल्हयातील माजी सैनिक,माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना शैक्षणिक वर्ष 2023-24 वर्षांसाठी शिष्यवृत्ती व विद्यावेतन वाटप करण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सातारा यांच्याकडे विहीत नमुन्यातील अर्ज दिनांक 31 डिसेंबर पर्यंत सादर करावेत असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा यांच्यातर्फे करण्यात आले आहे.