सातारा दि. 21 : धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचे बहुल्य असलेल्या राज्यातील शासनमान्य शैक्षणिक संस्थांना पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करुन देऊन शिक्षणाचा गुणात्मक दर्जा उंचावण्यासाठी शासनमान्य शाळांना पायाभूत सोईसुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित,विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, व अपंग शाळामध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना सन 2023-24 मध्ये राबविण्यात येत आहे. सदर योजनेचा परिपूर्ण प्रस्ताव शाळांनी दिनांक 10 ऑगस्ट पर्यंत जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे सादर करणेस शासनाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे.