सातारा, दि. 20 – जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्शवभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना पुढीलप्रमाणे आवाहन केले आहे. अतिवृष्टीमुळे दरडी कोसळणे, भूस्खलनामूळे धोका निर्माण होणाऱ्या गावातील नागरिकांनी अतिवृष्टीच्या कालावधीत सतर्क रहावे. धोकादायक स्थतीत अथवा मोडकळीस आलेल्या घरात राहू नये. स्वता:हून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे.
धोकादायक ठिकाणी शक्यतो प्रवास टाळावा. कडा कोसळणे/दरडी कोसळण्याच्या ठिकाणी थांबू नये. अतिवृष्टीचे काळात मोठया प्रमाणात डोंगरातून पाण्याचा प्रवाह सुरु असतो., ओढे-नाले पात्र भरुन वाहत असतात अशावेळी पूराच्या पाण्यात /ओढयातून प्रवास टाळावा. तसेच नदी, ओढ्यानाल्यावरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास धोकादायक स्थितीमध्ये पूल ओलांडू नये.
जिवित व वित्तहानी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे. पर्यटनाचे ठिकाणी उदा. धबधबे, तलाव इ. ठिकाणी धोकादायक ठिकाणी प्रवेश करु नये. त्याच प्रमाणे धोकादायक ठिकाणी फोटो काढण्याचे अथवा सेल्फी घेण्याचा मोह टाळावा. नदी अथवा नाल्याची पाणी पातळी वाढल्यास कोणत्याही परिस्थितीत नदी पात्रात प्रवेश करु नये.
अतिवृष्टीच्या कालावधीत तात्काळ सुरक्षित जागेत (नातेवाईक,समाजमंदिर,शाळा इ.ठिकाणी) स्वत: हून स्थलांतरित व्हावे. मान्सून कालावधीत साथीच्या रोगांपासून वाचण्यासाठी शक्यतो पाणी उकळून गार करुन प्यावे. वीजा कडकडत असताना कोणत्याही परिस्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये. (पाण्यात असल्यास तात्काळ बाहेर पडावे.)
नागरिकांच्या सुरक्षेसाठी व तात्काळ मदत मिळवण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन केले असून त्याचे संपर्क प्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. जिल्हास्तरावरील जिल्हा नियंत्रण कक्ष - फोन नं -02162-232349/232175. जिल्हयातील पोलीस विभाग- फोन नं.02162-233833/231181 मो.नं.-9011181888, पाटबंधारे विभाग फोन नं -02162-244681/244654/244481, सार्वजनिक बांधकाम विभाग फोन नं-02162-234989, आरोग्य विभाग फोन नं- 02162-233025/238494, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मो.नं-9029168554 या प्रमाणे आहेत.
मान्सून कालावधीत धरण क्षेत्रात होणारे पर्जन्यमान, धरणातील साठा, आणि पाण्याचा विसर्ग तसेच नदीपातळी इ. अदयावत माहिती ऑनलाईन प्राप्त करुन घेणेसाठी शासनाच्या www.Punefloodcontrol.com तसेच http://210.212.172.117/rtdas या संकेतस्थळावर भेट द्यावी.