सातारा दि.17 : खासगी वाहतूक बस चालक व स्कूल बस चालकांसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत दि. 20 ऑगस्ट 2023 रोजी कार्यालयातच सकाळी 11 वाजता नेत्र व आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी मातिी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली आहे. या विशेष तपासणी मोहिम कार्यालयामार्फत रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने राबविण्यात येत आहे. सर्व खासगी वाहतूक बस व स्कूल बस चालकांनी या नेत्र व आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ घ्यावा, असेही आवाहन श्री. चव्हाण यांनी केले आहे.