फलटण प्रतिनिधी -फलटण तालुक्यातील 42 गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात होता मात्र फलटण तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसापासून सुरू असणाऱ्या मान्सूनपूर्व पावसाने समाधानकारक स्थिती निर्माण झाली असून अनेक गावातील पाणी टँकरच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत तर 8 गावातील पाणी टँकर बंद करण्यात आल्याची माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
31 मे अखेर ते 33 टॅंकरने एकूण 42 गावांमध्ये 86 टँकरफेऱ्याद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. मात्र जून मध्ये पडलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे 11 जून रोजी फलटण तालुक्यातील 25 टँकरने गावांना 34 गावांना 61 टँकरफेऱ्याद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. तर 11 जून पर्यंत समाधानकारक पाऊस झाल्याने 8 गावांचे पाणी टँकर बंद झाले आहेत अशी माहिती सचिन ढोले यांनी दिली.
गत वर्षाच्या तुलनेत यावर्षी मे व जून मध्ये सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मे 2023 मध्ये 16 मी. मी. तर जून 2023 मध्ये 33 मी. मी. एवढा पाऊस झाला होता तर 2024 मध्ये अनुक्रमे मे 42.3 मी. मी. तर जून मध्ये 146.6 मी. मी. (11 जून 2024 पर्यत ) एवढा पाऊस झाला आहे. 2024 मध्ये पडलेल्या पावसाची टक्केवारी गतवर्षीपेक्षा मे मधील 176.25 टक्के तर जून मध्ये 175 टक्के (11 जून पर्यंत. ) असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले आहे.