फलटण प्रतिनिधी :
फलटण नगर परिषदेचे नगरअभियंता पंढरीनाथ नामदेव साठे यांची बदली झालेने नगर परिषद प्रशासन मुंबई यांचेकडील दि.३१/०७/२०२३ चे आदेशान्वये पदोन्नतीने संजय ज्ञानेश्वर कुंभार यांची फलटण नगर परिषदेचे नगर अभियंतापदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
नूतन नगर अभियंता संजय कुंभार यांना लोणावळा नगर परिषद, जि. पुणे, जुन्नर नगरपरिषद, जि. पुणे, शिरुर नगरपरिषद, जि. पुणे व कुळगांव बदलापूर नगर परिषद जि. ठाणे अशा मोठया नगर परिषदेमधील कामाचा चांगला अनुभव आहे. कुंभार यांना असलेल्या अनुभवाचा फलटण शहरातील विकासकामे करताना नक्कीच लाभ होईल असे मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी सांगितले. यावेळी विनोद जाधव, महात यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.