फलटण प्रतिनिधी: १० वी व १२ च्या परिक्षेच्या निकालानंतर विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेसह शासनाने केलेल्या विविध खात्यातील भरती प्रक्रियेसाठी सध्या विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी तहसिल कार्यालयातील सुविधा केंद्र (सेतू) व महा ई सेवा केंद्रे, आपले सरकार केंद्रामध्ये पालक वर्गाची मोठी झुंबड उडाली आहे. दरम्यानच्या काळामध्ये महा ऑनलाईन चे पोर्टल (प्रणाली) दिनांक १५-६-२०२३ पासुन ते ३/७/२०२३ पर्यंत पुर्णपणे तांत्रिक बिघाडामुळे पुर्णपणे बंद होते. त्यामुळे विद्यार्थी व पालक वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु फलटण महसुल खात्याचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले व तहसिलदार अभिजीत जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे संबंधीत प्रणाली दिनांक ०४/०७/२०२३ पासुन पुर्ववत समाधारकारक सुरु झाली त्यानंतर संबंधीत सेतू चालक व महा ई सेवा केंद्रे यांचा रोज आढावा व मार्गदर्शन करुन आठवडयामध्ये सर्वच्या सर्व प्रलंबित दाखले निर्गत करुन पालक वर्गामध्ये समाधानकारक वातावरण निर्माण केले.