सातारा दि.23 : सातारा जिल्हा परिषद सेस 2023-24 योजनेमधून कृषि आयुधे औजारे बाबींसाठी पाटण तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या अर्जांची सोडत 25 ऑगस्ट रोजी पाटण येथील पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी 11 वाजता लॉटरी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अर्जदारांनी सोडतीसाठी वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन गट विकास अधिकारी मीना साळुंखे व कृषि अधिकारी राजाराम लोखंडे यांनी केले आहे.