सातारा दि.7: 261 पाटण विधानसभा मतदार संघात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्वीप मतदार जागरुकता उपक्रमांतर्गत प्रशासनातर्फे पाटणच्या आठवडी बाजारात मतदारांमध्ये मतदान जागृती करण्यात आली. जागरुक मतदार लोकशाहीचा अंगरक्षक, भविष्याची कल्पना करा आणि योग्य पध्दतीने मत द्या, चला मतदान करुया, देशाची प्रगती घडवू या अशा आशयाचे फलक घेऊन पाटण आठवडी बाजारात जनजागृती करण्यात आली. यावेळी बाजारात खरेदीसाठी आलेल्या पुरुष व महिलांनी शंभर टक्के मतदान करण्याची ग्वाही दिली.