सातारा दि. 21 : जिल्हास्तरावर कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम 2013 अन्वये जिल्हास्तरीय स्थानिक तक्रार निवारण समितीतील दोन सदस्यांपैकी एक सदस्य या पदासाठी जिल्हयातील इच्छुक उमेदवारांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
उमेदवार महिलांच्या सोयीसाठी बांधील असलेल्या अशा अशासकीय संघटना/संघ किंवा लंगिक छळाच्या प्रश्नांशी परिचित असावा तसेच सदस्य अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर मागासवर्ग किंवा अल्पसंख्यांक समाजातील महिला असावी.
जे इच्छुक उमेदवार सदस्य या पदासाठी अर्ज करणार आहेत ते उमेदवार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर मागासवर्ग किंवा अल्पसंख्यांक समाजातील असावेत. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय सातारा येथे प्रस्ताव सादर करतेवेळी उमेदवाराने प्रस्तावासोबत स्वतः चा वैयक्तिक अर्ज, जातीचे प्रमाणपत्र व उमेदवार हे महिलांच्या सोयीसाठी बांधील असलेल्या अशा अशासकीय संघटना/संघ किंवा लैंगिक छळाच्या प्रश्नांशी परिचित असावेत व त्यासंदर्भातील अनुभव प्रमाणपत्र सोबत जोडलेले असणे अत्यावश्यक राहील. अन्यथा अर्जाचा विचार केला जाणार नाही.
तरी सदर बातमीपत्र प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून पुढील 8 दिवसांत सदरील प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सातारा सातारा एस.टी. स्टँडच्या पाठीमागे नवीन प्रशासकीय इमारत,दुसरा मजला याठिकाणी सादर करावेत. तसेच याविषयी अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 02162-237353 जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय सातारा येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सातारा यांनी केले आहे.