सातारा दि. 11 : फिलाटलीचा छंद वाढविण्यासाठी केंद्र शासनाने दीनदयाल स्पर्श या नावाने शालेय मुलांसाठी पॅन इंडिया शिष्यवृत्ती सुरु केली आहे. या शिष्यवृत्तीसाठी 8 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन सातारा विभागाचे प्रवर डाक अधिक्षक विलास घुले यांनी केले आहे.
या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हा मान्यताप्राप्त शाळेत असावा. शाळा ही फिलाटली क्लब असणे आवश्यक आणि उमेदवार क्लबचा सदस्य असावा. शाळा फिलाटली क्लबची स्थापना झाली नसेल तर स्वत:चे फिलाटली डिपॉझिट खाते असलेल्या विद्यार्थ्यांचा देखील विचार केला जाईल.
इयत्ता 6 वी ते 9 वीच्या 40 विद्यार्थ्यांना आणि अखिल भारतीय स्तरावरील 920 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. माहितीसाठी 002162-237437/237443 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा.