सातारा दि.26 : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ या कायदयाच्या व्यापक प्रसिध्दी व प्रभावी अंमलबजावणीकरिता शासन स्तरावरून सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत. दिनांक २८ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी अनंत चतुदर्शीची शासकीय सुट्टी असल्याने, माहिती अधिकार दिन २७ सप्टेंबर २०२३ रोजी साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांनी दिली आहे.
दिनांक २८ सप्टेंबर या दिवशी, शालेय शिक्षण विभाग तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे व इतर शैक्षणीक संस्थांमध्ये माहितीचा अधिकार या विषयावर आधारित प्रश्न मंजूषा, चित्रकला, निबंध व वक्तृत्व इ. सारख्या स्पर्धा तसेच चर्चासत्र व व्याखानमाला आयोजित करण्याबाबत तसेच जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मदतीने समाज कार्यकर्त्यांकरिता व इच्छुक गटांकरिता भित्तीपत्र स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चर्चासत्र व व्याखानमाला इ. उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.