सचिन नावाचा अर्थ खरे, शुद्ध, अस्तित्व, भगवान इंद्र असा आहे. सचिन नाव असलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये, स्वभाव आणि वर्तन त्याच्या अर्थानुसार असेल असे शास्र सांगते तरीही आपल्या नावातील अर्थ काय आहे या पेक्षा आपले कर्तव्य किती महत्वाचे आहे हे आपल्या कार्यातून दाखवून देणारे व्यक्तिमत्व म्हणजे फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले होय. सचिन हे नाव इतरांना मदत करण्याबद्दलचे प्रेम दर्शवते.
अधिकारी हा त्याच्या पदाने नव्हे तर त्या पदाचा उपयोग जनतेसाठी किती करतो यावरून त्या पदाची उंची वाढवत असतो व तेच काम आज फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले करताना दिसत आहेत हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
गेल्या काही महिन्यांपासून उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर फलटणच्या प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी आपला कार्याचा फोकस सकारात्मक दृष्टिकोनातून जनतेच्या हितासाठी करत फलटण उपविभागाला वेगळी ऊर्जा देण्याचे काम केल्याचे दिसून येत आहे. वेगवेगळ्या मिटिंग मधून त्यांचा दिसणारा वावर हा सहकारी अधिकाऱ्यांना प्रेरणा देत असल्याचे दिसून येते.
शेतकऱ्यांनी हितासाठी ई - पीक पाहणी नोंद केली पाहिजे यासाठी फलटण तालुक्यातील गावागावात जाऊन संपूर्ण महसूल यंत्रणा ई- पीक पाहणीचे फायदे शेतकऱ्यांना समजावून देण्याचे काम प्रांताधिकारी स्वतः करीत आहेत. शासनाने दि. ३० सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ दिल्याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले करताना दिसत आहेत.
पूर्वी तलाठ्यांमार्फत केली जाणारी पीक पाहणी नोंद आता मोबाईल ॲपद्वारे स्वतः शेतकऱ्यांनी करावयाची असल्याचे निदर्शनास आणून देत त्याबाबत प्रात्यक्षिकासह शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, महसूल मंडलाधिकारी, तलाठी कार्यरत आहेत. सोसायटी कर्ज, ऊसाची तोड, शासनाच्या कृषी विषयक विविध योजनांचा लाभ, अतिवृष्टी किंवा अवर्षन आणि पिकांच्या अन्य नुकसान साठी ई - पीक पाहणी नोंद अत्यंत आवश्यक आहे. नोंद नसेल तर यापैकी कोणताही लाभ संबंधित शेतकऱ्यांना घेता येणार नसल्याचे निदर्शनास आणून देत प्रत्येक शेतकऱ्याने ई - पीक पाहणी नोंद अवश्य करावी, असे आवाहन प्रांताधिकाऱ्यांनी करताना दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर, वाडया - वास्त्यावर फिरून काम करणारा अधिकारी फलटणकर पहिल्यांदाच पाहत आहेत.
भविष्यात फलटण उपविभागातील शेतकरी, कामगार,मजूर, सर्वसामान्य जनता यांना न्याय देण्याची भूमिका ढोले साहेब पार पाडतील यात तिळमात्र शंका नाही. त्याचबरोबर प्रशासन, पोलीस, कृषी यासह विविध विभाग कात टाकून नव्या जोमाने कार्यरत राहतील हिच अपेक्षा...
सचिन संपत मोरे, संपादक धैर्य टाईम्स, फलटण.
सातारा जिल्हाध्यक्ष, प्रिंट व डिजिटल मीडिया, महाराष्ट्र.