Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
शक्ती (अशोक) भोसले — युवकांचे प्रेरणास्थान, सामाजिक बांधिलकीची नवी ओळख : भावी नगरसेवक, उत्कृष्ट पत्रकार आणि क्रिकेटपटू रामराजेंच्या इंस्टाग्रामवरून अनिकेतराजेंचे प्रमोशन फलटण नगरपालिकेच्या मतदार याद्यांमध्ये घोळ – अनेक मतदार दुसऱ्याच प्रभागात, नागरिक त्रस्त माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन : रणजितसिंह भोसले सौ.अनिता प्रशांत काकडे यांना भाजपकडून नगरपालिका उमेदवारी द्यावी – कार्यकर्त्यांची ठाम मागणी गॅलेक्सीचा बारामती शाखेचे उद्घाटन संपन्न सहा महिन्यांत मधुमेह नुसता नियंत्रणातच नाही तर 'गोळी-मुक्ती'चा प्रवास यशस्वी लवकरच विजयी गुलाल! – समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्त्याचे स्टेटस चर्चेत फलटणचे नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी : दोन निंबाळकर पुन्हा आमने-सामने! प्रल्हादराव साळुंखे पाटील — सहकार, संघर्ष आणि सत्यनिष्ठेचा अविभाज्य दीपस्तंभ फलटणला पावसाने झोडपले – आठवडा बाजारात दैना, नागरिकांची तारांबळ फलटणच्या एसटी चालकाचा प्रामाणिकपणा : सापडलेले तब्बल अडीच लाखांचे सोन्याचे दागिने केले परत फलटण येथे विविध पदांची अर्जंट भरती सोलापूर व मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी फलटणकरांनी दिला मदतीचा हात : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्या उपस्थित मदत रवाना श्रीरामच्या निवडणुकीसाठी कधीही तयार : रामराजे ; याचिका मागे घेण्याचा निर्णय खासदार गटाकडे संस्थानी पर्यावरण समतोल राखण्यासाठी काम करावे : आमदार रामराजे मी महाराज साहेबांच्या विचारा बरोबर आहे : विश्वासराव भोसले खासदार गटाचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक अशोकराव जाधव भाजपमधून बाहेर पडणार ? व्हाट्सअप स्टेटस ने तालुक्यात खळबळ नाना-नानी पार्क व ओपन जिम या नियोजीत प्रकल्पाचे उद्या भूमिपूजन बाजार समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी मोहनराव डांगे यांची नियुक्ती स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युअलला इंडिया ग्रीन एनर्जी अवॉर्ड 30 सप्टेंबर पर्यत राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा : नागरिकांनी सुचनांचे पालन करावे फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीची सोमवारी वार्षिक सर्वसाधारण सभा संजीवराजे यांच्या एकसष्ठीचे कार्यक्रम स्थगित : मा. आ. दिपकराव चव्हाण : सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन पवार गल्ली नवरात्र उत्सवात जल्लोष कविता : एका धरणाकाठी... तेरी भीं चूप मेरी भीं चूप कुणाला काही सांगू नका...कबूल.. कबूल... विडणीमध्ये स्वच्छता अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद फलटण तालुक्यातील १३ किलोमीटर रस्त्यांना ग्रामीण मार्ग म्हणून दर्जा : मा खा.रणजितसिह नाईक निंबाळकर कु. वेदिनी साबळे हिची उच्च शिक्षणासाठी जर्मनीत निवड फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांचा पदोन्नतीनिमित्त सत्कार कोळकी ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे यांची राजे गटात घरवापासी : भाजपाला रामराम विडणीत उद्या महास्वच्छता अभियान : गावच्या लोकसंख्येएवढे वृक्षारोपण : सरपंच सागर अभंग फलटणच्या राजकारणात नवीन ट्विस्ट : नको येऊ तर कोणत्या गाडीत बसू... दोन डाकू एकत्र : युवराज शिंदे यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल फलटण शहरातील भाजी विक्रेत्यांना पारधी व तृतीयपंथीयांचा त्रास आमदार सचिन पाटील यांच्याकडून ह.भ.प. अर्जुनराव कापसे (महाराज) यांना सन्मानपत्र प्रदान उद्या फलटणच्या या भागात बत्ती गुल नवरात्रीतील प्रत्येक दिवसासाठी खास रंगांचे महत्त्व माजी नगरसेवक हरिष काकडे यांचे निधन फलटण शहरात अति वेगाने वाहने : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण शाश्वत विकासासह सशक्त पंचायत व लोकसहभागातून समृद्धी निर्माण करण्याचे ध्येय - आमदार सचिन पाटील फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान : पुरस्काराची हॅट्रिक महिलांच्या आरोग्यासाठी शासनाच्या विविध योजना : आमदार सचिन पाटील आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते सेवा पंधरवड्याची आज सुरवात - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव शेतक-यांची फसवणूक करणारी आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश - शहर पोलिसांना यश फलटण तालुक्यात महसूल विभागातर्फे सेवापंधरवडा साजरा होणार - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव बार्टी कार्यालयाबाहेर बॅनर याद राखा, तुमची गाठ माझ्याशी आहे : सरकारला इशारा संत नामदेव महाराज जयंती निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण ( पंजाब ) संत नामदेव चरण पादुका रथयात्रा व सायकल वारीचे आयोजन:फलटण येथे पहिला मुक्काम लुटूपुटूच्या लढाईची चर्चा ? दोन्ही निंबाळकरांचे patch up ?

लंपी त्वचा रोग आणि उपाययोजना

टीम : धैर्य टाईम्स

जिल्ह्यातील गावांमध्ये लंपी त्वचा रोग या रोगाचा प्रादुर्भाव आढळला आहे. या अनुषंगाने जिल्यातील पशुपालकांमध्ये सदर आजाराबाबत जनजागृती करणे अत्यावश्यक आहे. पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाने सूचित केलेल्या उपायोजनांनुसार आपल्या जनावरांची काळजी घ्यावी

लंपी त्वचा रोग हा गाई - म्हशींमध्ये होणारा विष्णुजन्य आजार असून या आजारात जनावरास प्रथम तीव्र स्वरुपाचा ताप येतो त्यानंतर डोळ्यातून पाणी व नाकातून स्त्राव येणे सुरु होते. लसीकाग्रंथींना सुज येते. जनावराची भुक मंदावून दुध उत्पादन कमी होते .जनावराचे डोके, मान,पाय ,पाठ मायांग,कास इ.भागावरील त्वचेबर हळु हळु 1 ते 5 से.मी.व्यासाच्या गाठी येतात. काही वेळा तोंडात, नाकात व डॊळ्यात व्रण येतात .तोंडातील व्रणांमुळे जनावरास चारा चघळ्ण्यास व रवंथ करण्यास त्रास होतो. डोळ्यातील व्रणांमुळे चिपडे येऊन पापण्या चिकटुन दृष्टी बाधीत होते.या आजारात जनावराला फुफुसदाह स्तनदाह देखील होतो.फुफुसदाह झाल्यामुळे जनावराला श्वसनास त्रास होतो व धाप लागते. रक्तातील पांढ-या पेशी व प्लेटलेट्स कमी होतात त्यामुळे जनावराला अन्य जीवानूजन्य आजार होण्याची शक्यता वाढते.पायावर सुज आल्याने जनावर लंगडते.

लंपी त्वचा रोग आजाराचा प्रसार हा प्रामुख्याने माश्या,गोचीड ,चिलटे यांच्यामार्फ़त एका जनावराकडुन दुस-या जनावरास होतो निरोगी जनावराचा रोगी जनावराशी   संपर्क झाल्याने देखील रोगाचा प्रसार होतो.   या रोगाचा पसरण्याचा दर हा 10 ते 20 टक्के असुन काही वेळा 45 टक्के पर्यंतही असतो. मृत्युदर 1 ते 5 टक्यापर्यंत आहे. या रोगाच्या नियंत्रणासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना करावयाच्या आहेत.

लंपी त्वचा रोगाचे नियंत्रण 

 या रोगाचा प्रादुर्भाव सहसा मानवास होत नाही. बाधीत जनावर हाताळणा-या पशुवैद्यकाने, शेतक-याने जैव सुरक्षा साधनांचा उपयोग करावा. हातात रबरी हातमोजे घालावेत. बाधीत जनावराच्या दुधाची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. दुध नेहमीच उकळून थंड केल्यावर पिण्यास वापरावे. दुध पाच्छाराईज करुन वापरावे.

साबण, डेटॉल, अल्कोहोल मिश्रीत निर्जंतूकीकरण द्रावणाचा, हात निर्जंतूकिरण करणेसाठी वापर करावा.   गोठा परिसर स्वच्छ व हवेशीर ठेवावा. परिसरात पाणी साठणार नाही, दुर्गंधी होणार नाही व किटक येणार नाहीत यासाठी दक्षता घ्यावी.  शेण खोल खड्यात अगर गोबर गॅस टाकीत टाकावे.  गोमुत्र शोषखड्यात सोडावे.  किटक नाशकांचा जनावरांवर, गोठ्यात व परिसरात वापर करावा.

आजारी जनावरांना व त्यांच्या संपर्कातील जनावरांना Ivermectin Injection दिल्याने किटकांचे नियंत्रण होते परिणामी या रोगाचे नियंत्रण होते असे दिसून आलेले आहे.  सद्यस्थितीत भारतात लंपी त्वचा रोगाची लस उपलब्ध नाही. शेळ्यांची कॅप्रीपॉक्स (उत्तर काशी स्ट्रेन) लस वापरुन या रोगाचे नियंत्रण करता येते. साथ रोग सुरु असताना बाधित गावांत व ५ कि.मी त्रिज्येच्या क्षेत्रातील गावांत लसीकरण करण्यात यावे. केवळ निरोगी जनावरास लसीकरण करावे. लसीकरण करताना प्रत्येक जनावरासाठी नविन सुई वापरावी.  आजारी जनावराचे निरोगी जनावरांपासून विलगीकरण करावे.

आजारी व निरोगी जनावरे एकाच ठिकाणी चरावयास अगर पाण्यावर सोडू नयेत.  डास, चावणा-या माश्या, चावणारे किटक इ. दूर करणारी अनेक नैसर्गिक औषधे व फ्लाय फ्रायर यंत्र यांचा वापर करावा. गोठ्यात पहाटे व सायंकाळी डास मोठ्या प्रमाणात शिरकाव करतात, अश्यावेळी मडक्यात सुके शेण जाळून धुर करावा. अश्यावेळी निलगिरी तेल, कापूर, भांबरुड झुडुपाची पाने, करंज तेल, कडुनिंब तेल, गवती चहाची पाने इ. चा वापर केल्यास डास गोठ्यातून दुर पळून जातात.  जनावरांना चरायला सोडण्यापूर्वी अंगावर करंज तेल, कडूनिंब तेल लावल्यास किटक चावत नाहीत. साथ रोग सुरु असताना महिष वर्गीय जनावरे गोवर्ग जनावरांपासून स्वतंत्र बाधावीत. साथ रोग सुरु असताना १० कि. मी त्रिज्येच्या क्षेत्रातील जनावरांचे बाजार बंद करावेत, जनावरांचे मेळावे व प्रदर्शने आयोजित करु नयेत.

बाधीत क्षेत्रातील जनावरांचे गोठे, परिसर, खाद्य भांडी, पाणी भांडी, हत्यारे, यंत्र सामग्री ही, योग्य औषधी उदा. १% क्लोरोफॉर्म, १% फॉरमॅलिन, २% फिनॉल, २% सोडियम हायपो क्लोराईड, आयोडीन द्रावण, इ. चा वापर करुन निर्जंतूक करावे. या रोगाची लक्षणे दाखवणारे जनावर आढळून आल्यास पशुपालकाने, ग्रामसेवकाने, तलाठ्याने, लोक प्रतिनिधीने अगर गावातील अन्य कोणत्याही व्यक्तीने याची खबर तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकाला दयावी. म्हणजे तातडीने पशुवैद्यकीय उपचार करणे, रोगाचे निश्चित निदान करणे, रोग नियंत्रणात आणणे, रोगाचा प्रसार रोखणे इ. कार्यवाही करणे शक्य होईल.

या रोगांत मयत झालेले जनावर ८ फुट खोल खड्यात शास्त्रोक्त पध्दतीने पुरावे.  ज्या गावामध्ये या रोगाने बाधित जनावरे आढळतील त्या गावातील पशुंची खरेदी विक्री काही कालावधीसाठी बंद करण्यात यावी.  आजारी जनावरांचा पशुवैद्यकाकडून दैनंदिन उपचार करुन घ्यावे.

 जिल्हयातील एकूण 3 लाख 52 हजार 436 गोवर्गीय जनावरांपैकी 3 लाख 23 हजार 67  जनावरांचे लंम्पी चर्म रोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले असून उर्वरित जनावरांची लसीकरण मोहीम वेगाने सुरु आहे. सर्व पशुपालकांनी आपल्या गोवर्गीय जनावरांना लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन पशुसंवर्धन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

 संकलन                                                                                                           जिल्हा माहिती कार्यालय, सातारा

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER