सातारा, दि. १७ महालेखापाल कार्यालय मुंबई व कोषागार कार्यालय सातारा यांचे संयुक्त विद्यमाने २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सातारा मुख्यालयातील यंशवतराव सभागृहात महाराष्ट्र शासणातील जे निवृत्तिवेतनधारक कोषागार कार्यालय सातारा येथुन निवृत्तीवेतन घेत आहेत, त्यांच्यासाठी पेन्शन अदालतीचे आयोजन केले आहे. तसेच सातारा जिल्हयातील सर्व आहरण व सवितरण अधिकारी यांचेसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर पेन्शन अदालतीमध्ये महालेखापाल कार्यालयातील वरिष्ठ लेखाधिकारी मार्गदर्शन करणार असुन निवृत्तिवेतनधारक व आहरण व संवितरण अधिकारी यांना येणाऱ्यां सर्व अडचणींचे निराकारण करण्यात येणार असुन सदर पेन्शन अदालतीस निवृत्तिवेतनधारकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे अहावन प्रभारी कोषागार अधिकारी श्री. योगेश करंजेकर व अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्ती वेतन ) प्रवीण पाटील यांनी केले आहे.