सातारा, दि. 18 : खंडाळा तालुक्यातील कोतवाल संवर्गातील सरळ सेवा भरतीसाठी इच्छुकांनी तहसिलदार खंडाळा यांच्या कार्यालयात 20 ते 28 जुलै 2023 या कालावधीत सकाळी 11.00 ते सायकांळी 5.00 (शासकीय सुट्टया वगळून) समक्ष पोहोच करावेत, असे आवाहन तहसिलदार अजित पाटील यांनी केले आहे.
अर्ज दाखल करताना विहित नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रांसह दाखल करावा, मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
खंडाळा तालुक्यातील कोतवाल पद नियुक्तीसाठी जात प्रवर्गाचे आरक्षण पुढीलप्रमाणे, सजाचे नाव, कंसात उमेदवार ज्या प्रवर्गातून भरला जाणार आहे तो प्रवर्ग - वाठार बु (अनुसुचित जमाती), नायगांव (आर्थिक दृष्ट्या दुर्बल-इडब्ल्युएस), भोळी (अराखीव महिला) राजेवाडी (अराखीव महिला), विंग (अराखीव (खुला)), खेड बु, (अराखीव (खुला)).
कोतवाल भरतीसाठी रविवार दि. 6 ऑगस्ट 2023 रोजी लेखी परिक्षा तर बुधवार दि. 9 ऑगस्ट 2023 रोजी अंतिम निकाल जाहीर होणार आहे. या पदासाठी उमेदवार किमान 4 थी पास असावा व त्यास किमान मराठी भाषा लिहिता वाचता येणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय 18 जुलै 2023 रोजी किमान 18 व कमाल 40 वर्षे असावे. इच्छुकांनी विहित मुदतीत विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज समक्ष पोहोच करावेत.