फलटण | धैर्य टाईम्स |
फलटण येथील गिरवी नाका परिसर व सार्वजनिक बांधकाम विश्रामगृहा शेजारील माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या उद्योग समूह च्या वतीने लावण्यात आलेले दोन्हीही होर्डिंग पालिका प्रशासनाने हटवले आहेत. धैर्य टाईम्सच्या बातमीने प्रशासनाला जाग आणण्याचे काम केल्याने अनेकांनी धैर्य टाईम्सचे अभिनंदन केले आहे.
फलटण नगरपालिका हद्दी मध्ये कोणत्याही प्रकारे फ्लेक्स अथवा होर्डिंग लावण्यास बंदी असताना दिलीपसिंह भोसले यांच्या अमृत महोत्सवाचे होर्डींग गिरवी नाक्या नाजिक झळकू लागल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. सदरचे अनधिकृत होर्डींग हटवण्यात यावे यासाठी स्थानिकांनी मागणी केली होती. अखेर धैर्य टाईम्सने बातमी प्रकाशित केल्याने पालिका प्रशासनाने दोन्हीही होर्डिंग काढून जप्त केले.
धैर्य टाईम्सच्या बातमीच्या दणक्याने पालिका प्रशासनाने होर्डींग हटवले असले तरीही यावर दंडात्मक कारवाई मुख्याधिकारी निखिल मोरे करणार का? अशी चर्चा आता फलटणमध्ये होऊ लागली आहे. याकडे आता फलटणकरांचे लक्ष लागून राहिले आहे.