सातारा दि.17 : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत देण्यात येणाऱ्या बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कारासाठी www.awards.gov.on या संकेतस्थळावर दि. 31 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
ज्या मुलांनी (वय 5 पेक्षा अधिक व 18 वर्षा पर्यंतच्या) शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपूण्यपूर्ण कामगिरी केलीली आहे, अशा मुलांना बाल शक्ती पुरस्कार देण्यात येतो.
बाल कल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला बाल कल्याण पुरस्कार देण्यात येतो. ही संस्था पूर्णत: शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी. बाल कल्याण क्षेत्रात किमान 10 वर्षे सातत्यपूर्ण कार्य करणारी असावी.
बाल शक्ती पुरस्कार सन 2024 व बाल कल्याण पुरस्कार 2024 करिता केंद्र शासनाने अर्ज मागविले आहेत. पुरसकाराच्या माहितीसाठी www.awards.gov.on या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.