सातारा दि.22 : महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थायनाच्या शाळामध्ये पवित्र वा संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करिता शिक्षक अभियोग्यता व राष्ट्रीयता चाचणी (TMT)- २०२२ दिनांक 22 फेब्रुवारी 2023 ते दि. 3 मार्च 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल दि. 24 मार्च 2023 रोजी प्रसिध्द करण्यात आला व गुणवत्ता यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे,अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे.
या परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना त्यांचे गुणपत्रक score card वेबलिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आले होते. सदर वेबलिंक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) २०२२ या परिक्षेचा निकाल दि 24 मार्च 2023 रोजी लागला. तद्नंतर उमेदवारांच्या माहितीसाठी दिनांक 24 मार्च 2023 पर्यंत उमेदवारांच्या लॉगिनमध्ये गुणपत्रक उपलब्ध करून देण्यात आले होते. उमेदवारांना त्यांचे गुणपत्रक ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करण्याबाबत सद्यस्थिती मध्ये सदर वेब लिंक बंद करण्यात आले आहे.
गुणपत्रक हे उमेदवारांच्या माहितीसाठी असून सध्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या गुणवत्ता यादीची प्रिंट काढून उमेदवार ती माहितीसाठी वापरु शकता. पवित्र पोर्टल संबंधित गुणवत्ता यादी परीक्षा परिषदेकडून शिक्षण आयुक्त कार्यालयास उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहितीही आयुक्त श्रीमती ओक यांनी दिली आहे.