सातारा, दि. १७ : जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने राज्यभरातील सर्व 434 शासकीय आयटीआय मध्ये संविधान मंदिराचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा पार पडला.
देशाचे उपराष्ट्रपती माननीय जगदीशजी धनकड यांचे हस्ते एलफिस्टन टेक्निकल हायस्कूल मुंबई,ज्या ठिकाणी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलेले होते, अशा ऐतिहासिक वास्तूत प्रातिनिधिक स्वरूपाचे लोकार्पण झाले. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सर्व आयटीआय मध्ये दाखवले गेले.
त्यानंतर प्रत्येक ठिकाणी संस्था स्तरावर उभारलेल्या संविधान मंदिरांचे लोकार्पण सोहळे मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाई येथे या कार्यक्रमासाठी तहसीदार वाई, मिटकरी मॅडम, समाजिक कार्यकर्ते विजय सातपुते ॲड.विजय जमदाडे औदयोगिक संस्थेचे आजी माजी विद्यार्थी स्थानिक नागरीक आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य मिलिंद उपाध्ये यांनी केले. याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने मागील आठवडाभर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये विजेत्यांना पारितोषिक देखील देण्यात आली. संविधान मंचाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर सर्व संस्थांमध्ये वक्तृत्व, निबंध, चित्रकला, पोस्टर, गीत गायन, पथनाट्य अशा विविध स्पर्धा तसेच विविध क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांना देखील चर्चासत्रे आयोजित करण्यात आलेली होती.