सातारा, दि. 5 – जिल्ह्यातील कोतवाल संवर्गातील रिक्त असलेल्या पदांच्या 80 टक्के मर्यादेत पदे भरण्याबाबत सुधारीत कार्यक्रम देण्यात आला आहे. सहाय्यक आयुक्त पुणे (मागासवर्ग कक्ष) यांच्याकडील मंजूर बिंदुनामावली प्रमाणे कोतवाल पद रिक्त सजांची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. सदर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सभागृह, तलाठी निवास, बस स्टॅंड समोर शुक्रवार दि. 14 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वा. होणार आहे.
सातारा तालुक्यात एकूण 72 सजे मंजूर असून एका सजास एक कोतवाल या प्रमाणे फक्त 47 पदे कार्यरत आहेत. त्यामुळे सातारा तालुक्यात सातारा, दरे बु., भाटमरळी, कुसवडे, आंबवडे खु., आंबवडे बु., करंडी, परळी, ठोसेघर, कामथी तर्फे सातारा, कामथी तर्फे परळी, वर्ये, गोवे, कण्हेर, नुने, आष्टे, वडगाव, आलवडी, वाढे, कोडोली, काशिळ, अतित, निनाम, पाटखळ, शिवथर या सजांमधील कोतवाल पदे रिक्त आहेत.
आरक्षण सोडतीच्या पार्शवभूमीवर कोतवाल पदे रिक्त असलेल्या सातारा तालुक्यातील गावांमधील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, समाजिक व राजकीय कार्यकर्ते, गाव तंटामुक्तीचे अध्यक्ष तसेच संबंधित ग्रामस्थांनी सोडतीच्या ठिकाणी उपस्थित रहावे असे आवाहन राजेश जाधव, तहसिलदार सातारा तथा सदस्य सचिव, कोतवाल निवड समिती, सातारा यांनी केले आहे.