सातारा दि.28: जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा आवारातील २३२.७५ स्क्वेअर मीटर एरियामधील २ गाळे भाडेतत्वावर देणे आहे. यासाठी माजी सैनिक/वीर पत्नी/वीर माता-पिता/माजी सैनिक पत्नी महिला बचत गट यांना प्राधान्य देण्यात देण्यात येणार आहे. तरी इच्छुकांनी जागेची प्रत्यक्ष पाहणी करून आपली दरपत्रके तत्काळ या कार्यालयात सादर करावीत असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी ०२१६२-२३९२९३ या क्रमांकावर संपर्क साधावा.