सातारा दि.17 : प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण एस.एस. अडकर यांच्या मार्गदर्शनानुसार विधी सेवा सादन येथे बाल न्याय मंडळासाठी काम करणाऱ्या वकील, सदस्य, पोलीस अधिकाऱ्यांसाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीरामध्ये प्रमुख न्यायदंडाधिकारी, बाल न्याय मंडळ एस.डी. सावकर यांनी किशोर मुलांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्याआधी तसेच हजर केल्यानंतर कोणकोणती काळजी घेणे आवश्यक असते या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच वरिष्ठ दिवाणी न्यायाधिश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव यांनी बाल न्याय मंडळाचे काम करीत अणाऱ्या पॅनेल वकील व पोलीसांचे अडचणी जाणून घेऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन ॲङ आशिष राठोड यांनी केले.