सातारा प्रतिनिधी -
राज्य शासनाकडून वृध्द कलावतांना दरमहा मानधन कलाकारांच्या खात्यावर वर्ग केले जाते. सातारा जिल्ह्यात ७४४ कलाकारांची आधार व मोबाईल पडताळणी करणे बाकी आहे. तसेच ज्या कलावतांना या योजनेचा लाभ मिळाला असुन मयत झालेले आहेत अशाच्यां वारसांनी सहा महिन्याच्या आत नोंदणी करणे आवश्यक आहे. अन्यथा सबंधिताचे मानधन बँक खात्यात जमा होणार नाही.
या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांनी आपले आधार क्रंमाक व मोबाईल क्रंमाक ऑनलाईन पोर्टलव्दारे १० डिसेंबरच्या आत करावे. तसेच याबाबत काही अडचण आल्यास पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण आधिकारी सातारा यांनी केले आहे.