महिलांसाठी ठेवीवर अर्धा टक्का जादा व्याजदर, सोने खरेदीसाठी कर्ज योजना, सोनेतारण कर्ज योजना, अशा अनेक योजना प्रारंभ निधीच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत. महिलांसाठी हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करून त्यांनाही या प्रवाहामध्ये सामील होण्यासाठी संस्था त्यांना व्यवसायासाठी कर्जरूपाने आर्थिक मदत उपलब्ध करून देणार आहे.
फलटण तालुक्यामध्ये अल्पावधीतच नावारूपाला आलेली व समाजातील तळागाळातील लोकांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्याच्या दृष्टीने व बचतीची सवय लावण्यासाठी स्थापन झालेली प्रारंभ निधी या संस्थेच्या माध्यमातून मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती प्रारंभ निधीच्या वतीने करण्यात आले आहे.
ऑफिस नंबर 8, पुष्प कॉम्प्लेक्स, पी.एन. गाडगीळ अँड सन्स शेजारी, रिंग रोड लक्ष्मी नगर, फलटण येथे दि 26 जानेवारी 2023 रोजी दुपारी 3 ते 6 या वेळेमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. समारंभाच्या निमित्ताने महिलांसाठी ठेवीवर अर्धा टक्का जादा व्याजदर, सोने खरेदीसाठी कर्ज योजना, सोनेतारण कर्ज योजना, अशा अनेक योजना प्रारंभ निधीच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत. याचा फायदा ठेवीदार व ग्राहकांना होत आहे म्हणून महिलांसाठी हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करून त्यांनाही या प्रवाहामध्ये सामील होण्यासाठी संस्था त्यांना व्यवसायासाठी कर्जरूपाने आर्थिक मदत उपलब्ध करून देणार आहे, तरी महिलांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आव्हान संस्थेच्या संचालिका अँड. वैशाली गाडे, संचालिका पूनम माने व्यवस्थापक संदीप सस्ते यांनी केले आहे.