फलटण प्रतिनिधी : प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त सर्वधर्मीय बांधवांनी एकत्रीत सर्वधर्म समभावचा संदेश देत उत्साहित वातावरण मधे खराडेवाडी (ता. फलटण ) येथे जयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली.
इतरांना मार्गदर्शन, उपदेश व आदेश करण्यापूर्वी सर्वप्रथम स्वतः आचरण करणे हा प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा विशेष स्वभावगुण होता. मनमिळावू, सभ्यता, विनम्रता, प्रेमळ स्वभाव, शत्रूंना माफ करणे, द्वेषभावना न बाळगणे आदी विशेष गुण त्यांच्यात होते. त्यांच्या तोंडून विरोधकांविषयी कधीही अपशद्ब निघाले नाही. उलट ते त्यांच्याशी प्रेमानेच वागले, बोलले. सर्वश्रेष्ठ अल्लाहताअलाच या सृष्टीचा निर्माता आहे. त्याच्याइतका कोणीही श्रेष्ठ नाही, असे ते अपल्या प्रवचनातून उपदेश करीत असत. कितीही कठीण प्रसंग आले, तरी सत्याचा मार्ग सोडायचा नाही असे ते सांगत. वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप (परदा) घेतला. त्यांनी दाखवून दिलेला सत्याचा मार्ग, त्यांनी केलेल्या उपदेशांवर प्रामाणिकपणे आचरण, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालण्याचा संकल्पच पैगबरांप्रती खरी श्रद्धा ठरेल. तसेच त्यांचा सच्चा अनुयायी होण्याचा गौरव प्राप्त होईल. एका अर्थाने पैगंबर मुहम्मद यांची जयंती साजरी करण्याचे सार्थक होईल.
यावेळी खराडेवाडी गावच्या सरपंच श्रीमती कुसुमताई खराडे, उपसरपंच समिर पठाण, सदस्या कविताताई मोहिते, सदस्य सुनील बनकर, नंदकुमार कदम, सतिश टिळेकर, शंकरराव भोसले,सतिश टिळेकर, सोमनाथ टिळेकर, विनायक भुजबळ मंगेश भोसले, ॲड.बाळासाहेब चौधरी, अनिल चौधरी, वसीम ईनामदार, आयुब पठाण, जुबेर पठाण, रिजवान शेख, रशिद पठाण, रहिमानभाई शेख सर, तसेच जय हनुमान नवतरुण मंडळाचे सर्व सदस्य तसेच गावातील हिंदू-मुस्लिम बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.