Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षण सोडत जाहीर मेंढपाळाचा मुलगा झाला आयपीएस : बिरदेव डोणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल तालुक्याचा विकासाचा बॅकलॉक भरून काढणार - मा. खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर शहराचा पारा ४२ पार ? प्रशासनाकडून माहिती देण्यास टाळाटाळ ; प्रशासनाकडून नागरिकांना कोणत्याही सूचना नाहीत फलटण तालुका भाजपा मंडल अध्यक्षांच्या निवडी जाहीर : अमित रणवरे, लक्ष्मणराव सोनवलकर, विकास उर्फ बापूराव शिंदे यांना संधी डॉ. आंबेडकर पुतळा सुशोभीकरणाला विलंब का ? आंबेडकरी अनुयायांचा प्रश्न डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया फलटण शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी वाचनालयास पुस्तके भेट पत्रकारांची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असावी - उपमुख्यमंत्री अजित पवार समोसे, जिलेबी, कचोरीला इंग्रजीत काय म्हणतात? खूप कमी लोकांना ठाऊक आहे इंग्रजी शब्द... चला तर मग गॅलेक्सीच्या चेअरमनपदी सचिन यादव तर व्हॉइस चेअरमनपदी योगेश यादव ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र बेडकिहाळ यांचा उद्या साताऱ्यात गौरव समारंभ फलटण तालुक्यातील थेट सरपंच निवडी आरक्षण सोडत २४ एप्रिल रोजी - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव हातचालखीने ए.टी.एम.कार्डचा वापर करुन पावणे दोन लाखाला गंडा फलटण शहरात एकाच दिवशी दोन ठिकाणी गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावण्याचे प्रकार विविध समाजाने एकमेकांकडे पाहताना दृष्टिकोन बदलावा - सचिन मोरे कु. अक्षता आबासाहेब ढेकळे या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडूला शिवछत्रपती राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार जाहिर तंत्रज्ञानाच्या युगात सावधान... MS-CIT शिकायचं आहे ! अधिकृत सेंटरलाच प्रवेश घ्या भीमज्योत घेऊन महिला धावणार - निंभोरे ते मुंजवडी भीमज्योतीचे आयोजन पिंपरद (ता. फलटण )येथे उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन पदर आईचा अन् आयुष्याचा.... युपीआय सेवा आणि गुगल पे सेवा बंद : वापरकर्त्यांकडून प्रचंड तक्रारी महात्मा फुले यांना जन्मदिनानिमित्त तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्याकडून अभिवादन फलटण येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात महात्मा ज्योतिराव फुले यांना डॉ. आंबेडकर जयंतीमंडळाच्या वतीने अभिवादन सांधे - दुखी आणि त्यावरील आधुनिक उपचार : प्रसिद्ध अस्थिरोग शल्य चिकित्सक डॉ प्रसाद जोशी DD संह्याद्रीवर थोर समाज सुधारक - महात्मा जोतिबा फुले फलटण येथे भगवान महावीर जयंती उत्साहात संपन्न - आमदार सचिन पाटील यांनी केले अभिवादन बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना फायदे मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील - आमदार सचिन पाटील टंचाई भागातील गावे पाण्यापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी -पालकमंत्री शंभूराज देसाई भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहाचे सामाजिक न्याय विभागामार्फत आयोजन फलटण वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड.नितीन जाधव तर सचिवपदी ॲड. निलेश भोसले मिशन लक्ष्यवेध अंतर्गत क्रीडा क्षेत्रातील संस्थांनी आर्थिक सहाय्यासाठी 7 एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हा क्रीडा कार्यालयाचे आवाहन विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घेणेबाबत आवाहन डिजीटल क्रॉप सर्वे मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांनी पिक नोंदणी करण्याचे आवाहन सहयाद्री सहकारी साखर कारखानाच्या हद्दीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 मधील तरतुदी लागू सातारा जिल्ह्याच्या उद्योगवाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्नशील - उद्योग मंत्री उदय सामंत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय साताराचे लोकार्पण पुसेगांव शासकीय विद्यानिकेतनला ११ लाखांचे पारितोषिक प्रवासी व माल वाहतूक वाहनांसाठी एमएच-11 डि व्ही मालिका सुरु ; शासकीय फी भरुन आकर्षक क्रमांक आरक्षित करा जिवंत सातबारा मोहीम फलटण तालुक्यात प्रभावीपणे राबविणार - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव फलटण येथील प्रभाग ९ येथे पाहणी दौरा : प्रभागासाठी 50 लाख रूपये व नविन नाट्यगृहा साठी 8 कोटी रूपये मंजुर ऐन उन्हाळ्यात विजेचा लपंडाव : वारे व पावसात महावितरण ची यंत्रणा कोलमडली डॉ. आंबेडकर जयंती मंडळाकडून इफ्तारचे आयोजन : दलित मुस्लिम ऐक्याचे अनोखे दर्शन 1 एप्रिल रोजी सासवड येथे विविध कामांचा लोकार्पण व भूमिपूजन समारंभ - श्रीमंत रामराजे यांची प्रमुख उपस्थिती मनोज मारुडा यांची जिल्हास्तरीय समिती सदस्यपदी निवड आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस फलटण येथे विविध उपक्रमांनी साजरा होणार : माजी आमदार दिपकराव चव्हाण महात्मा बसवेश्वर सामाजिक समता - शिवा पुरस्कारसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय आवारातील गाळे भाडेतत्वावर - इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्ह्यात रेव पार्टीचे आयोजन होणार नाही यासाठी पोलीसांनी दक्षता घ्यावी - जिल्हाधिकारी संतोष पाटील अक्षय चव्हाण यांच्या कुटुंबीयांना सर्व अधिकार मिळवून देणार - जिल्हाधिकारी संतोष पाटील विजयकृष्ण थोरातने आर्चरी स्पर्धेत पटकावले ब्राँझ मेडल

दुष्काळी माण तालुक्यातील केसर आंबा निघाला दुबईस..

खडकीच्या वेदपाठक शेतकरी बंधूंची आधुनिक पद्धतीने लागवड; प्रति किलोला 140 ते 150 रुपये दर
टीम : धैर्य टाईम्स
दुष्काळी माण तालुक्यातील खडकी येथील हरिभाऊ व प्रमोद वेदपाठक या शेतकरी बंधूंनी शासकीय अनुदान योजनेतून लागवड केलेल्या आंबा फळ बागेतील दहा टन केसर आंबा दुबईस विक्रीसाठी निर्यात करण्यात आला.

म्हसवड : दुष्काळी माण तालुक्यातील खडकी येथील हरिभाऊ व प्रमोद वेदपाठक या शेतकरी बंधूंनी शासकीय अनुदान योजनेतून लागवड केलेल्या आंबा फळ बागेतील दहा टन केसर आंबा दुबईस विक्रीसाठी निर्यात करण्यात आला.

तालुका कृषी अधिकारी प्रकाश पवार यांच्या हस्ते या बागेतील आंबा फळांची तोडणी करण्यात आली.

यावेळी प्रभाकर व भाग्यश्री वेदपाठक, प्रमोद वेदपाठक, प्रभारी मंडल कृषी अधिकारी सदाशिव बनसोडे, कृषी पर्यवेक्षक सिद्धार्थ भोसले, कृषी सहायक जयवंत लोखंडे, राहुल कांबळे, महेश वाघ, गणेश माळी, अक्षय कुंभार, संजय बेलदार, रणजीत आरगे, बापू केंजळे, महेश फुले व आंबा खरेदीदार व्यापारी उपस्थित होते.

यावेळी पवार म्हणाले, ‘वेदपाठक कुटुंबास बागेतच प्रति किलो 140 ते 150 रुपये किलो दराने आंबा विक्री झाल्यामुळे या शेतकरी कुटुंबास सुमारे पंधरा लाखाचे उत्पन्न मिळू शकले. माण तालुक्यातील खडकी गावातील केसर आंबा प्रथमच विदेशातील दुबईच्या बाजार पेठेत निर्यात होत आहे. माण तालुक्यात अत्यंत कमी पावसाचे प्रमाण असल्यामुळे अवर्षण-प्रवण क्षेत्रात हा तालुका गणला जातो. या तालुक्यात मुरमाडट खडकाळ, चढउतार व डोंगरी भूभागाचा प्रदेश अधिक असूनही येथील हवामान मात्र सर्व प्रकारच्या फळ बागेस अत्यंत पोषक असे आहे.

या तालुक्यात शासकीय अनुदानातून 258 आंबा, एक हजार पाचशे डाळिंब, प्रत्येकी दोनशे हेक्टर पेरू व सीताफळाची लागवड झालेली आहे. या बरोबरच मोसंबी चिक्कू, संत्रा, ड्रैगन फ्रूट आदी फळबागांचे प्रयोग यशस्वी झालेले आहेत. गावोगावच्या शेतकर्‍यांनी पारंपरिक पिका ऐवजी फळबागावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक असून निर्यातक्षम फळबागांचे शास्त्रीय पद्धतीने अचूकरीत्या संगोपन केले तर फळे निर्यात करून विक्रमी दराने विक्री करणे शक्य होत असते.

खडकी येथील श्री वेदपाठक शेतकरी कुटुंबाने कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनपर सुचनांचे पालन करुन आंबा बागेची जोपासना केल्यामुळेच निर्यातक्षम फळांसाठी आवश्यक असलेल्या सर्व निकषास त्यांचा आंबा पात्र ठरला व या तालुक्यात प्रथम त्यांचा आंबा निर्यात झाला. त्यांच्या या अनुभवाचा इतर शेतकरी बांधवांनी फायदा घेऊन भविष्यात परदेशात निर्यात होईल त्या गुणवत्तेचे फळ उत्पादन करावे. फळबागांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या अनुदानातून ठिबक सिंचन, शेततलाव, अत्याधुनिक शेती अवजारे याबरोबरच शेती व फळबाग बाबत तज्ज्ञांची शेतकरी प्रशिक्षण शिबिरे सहली, कृषी खात्या मार्फत वेळोवेळी आयोजित केली जातात याचा लाभ शेतकर्‍यांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रभाकर वेदपाठक म्हणाले, माण तालुक्यात सरासरी पावसाचे प्रमाण साडेचारशे मिलीमीटर इतके आहे, प्रत्येक दहा वर्षाच्या कालावधीत सलग दोन ते चार वर्षे या भागात समाधानकारक पाऊसच पडत नसल्यामुळे येथील शेतकरी व सामान्य नागरिकांना पिण्याच्या पाणी टंचाईसह दुष्काळाच्या संकटाचा सामना करावाच लागतो असा इतिहास गेल्या शंभर वर्षातील शासकीय अहवालात नमूद केलेल्या नोंदी वरुन निदर्शनास येतो. 

या तालुक्यातील भौगोलिक व नैसर्गिक व पर्जन्यमानाचा इतिहास जरी शेतकरी बांधवांना शेतीसाठी आव्हानात्मक असा असला तरीही या तालुक्याती नैसर्गिक हवामान विशेषत: सर्व प्रकाळच्या द्राक्ष,ड्रग ड्रायफ्रूट या वेलवर्णीयसह आंबा,नारळ,चिक्कू,पेरु, सिताफळ,रामफळ,चिंच, आवळा,केळी,मोसंबी इत्यादी फळबागांसह कोकण पट्टीतील फणस,काजू व सिमला, जम्मू- काश्मिर भागातील सफरचंद फळबागचेही प्रयोग स्वरुपात लागवड केलेल्या फळबागेत यश मिळवित आहेत हि बाब कौतुकास्पद अशीच आहे.अनेक फळ बागांना येथील हवामानच अत्यंत पोषक असे आहे.शेतकरी बांधवांनी लागवड केलेल्या विविध फळबागांतून असल्याचे निदर्शनास आले 

सन 2009 मध्ये आम्ही केसर जातीच्या तिनशे रोपांची लागवड केली होती. या फळबागेस शासनाच्या कृषि विभागाचेही वेळोवेळी प्रोत्साहनपर असे सहकार्य व मार्गदर्शन लाभले ठिबक सिंचन, शेततळेसाठी शासनाचे अनुदान मिळाले होते,गेल्या दोन वर्षापुर्वी सलग चार वर्षे समाधानकारक पाऊसच न झाल्यामुळे पाणी टंचाईचे मोठे संकट आले तरीही आम्ही टँकरने बागेस पाणी देऊन सर्व झाडे जिद्दीने जोपासली गेल्या वर्षी मात्र समाधानकारक पाऊस वेळेवर झाला व हवामानही पोषक असे टिकून राहिल्यामुळे झाडाची वाढ जलदगतीने झाली व योगायोगाने यावर्षी सर्व झाडे मोहरांनी बहरली सुमारे साठ टक्के प्रत्येक झाडास फळधारणा झाली व ती टिकूनही राहिली निसर्गाने साथ दिल्यामुळे बागेच्या संगोपनासाठी खुपच परिश्रम घेतले,वेळोवेळी कृषि विद्यापिठातील कृषि तज्ञांशी संपर्क साधून व शेतकरी मार्गदर्शपर शिबीरात उपस्थित राहिल्यामुळे फळ वाढीस व निर्यातक्षम फळासाठी आवश्यक असलेल्या सर्व निकषाचे पालन करुन बाग यशस्विरित्या जोपासण्यास यश मिळविले यामध्ये माझी पत्नी भाग्यश्री व बंधू प्रमोद यांचेही मोठे  योग्यदान मिळाल्यामुळेच हे शक्य झाले.

सुमारे दहा टन उत्पादन मिळू शकल्यामुळे या विक्रीतून  त्यांना सुमारे पंधरा लाख रुपये हाती येऊ शकतील व बाग संगोपनास सुमारे दोन लाख रुपये खर्च वजा जाता 13 लाखांचे उत्पन्न हाती येणार आहे.

अवर्षण प्रवण दुष्काळी माण तालुक्यातील शेतकरी बांधवांनी प्रत्येक फळबागेस येथील पोषक हवामान व फळबागेस शासनाच्या कृषी विभागामार्फत देण्यात येत असलेल्या अनुदानासह बाग संगोपनाविषयी वेळोवेळी आयोजित केलेल्या मार्गदर्शनपर कृषी तज्ज्ञांच्या शिबीराचा फायदा घेऊन शेतात पारंपरिक पिके घेण्या ऐवजी फळबाग लागवडीचा लाभ घेण्याचे आवाहन वेदपाठक यांनी केले आहे.


शक्यतो केसर हा आंबा इतर जातीच्या आंब्याच्या विक्रीचा सिझन संपल्यानंतर जून-जुलै महिन्यात परिपक्व होऊन बाजारपेठेत विक्रीस येतो. परिणामी, दर कमी मिळतो हा अनुभव पाहता आमच्या बागेतीलआंबा फळे मात्र सर्व प्रथम चालू एप्रिल महिन्यातच परिपूर्ण वाढ होऊन त्यास पाड लागल्यामुळे दुबई या परदेशी बाजारपेठेतील मागणी पाहता तेथे तो निर्यात होऊ शकला व बागेतच 140 ते 150 प्रति किलो असा विक्रमी दर मिळाल्यामुळे आर्थिक उत्पन्नात निश्‍चितच वाढ झाली.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER