सातारा, दि. 3 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मोठे करण्यात माता भिमाबाई आंबेडकर यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचे सातारा येथील स्मारक भव्य दिव्य होण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
माता भिमाबाई आंबेडकर यांचे सातारा येथील स्मारकाच्या जागेची पहाणी श्री. आठवले यांनी केली. यावेळी ते बोलत होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण साताऱ्यात झाले. माता भिमाबाई यांचे सातारा येथील स्मारक भव्य दिव्य होण्यासाठी शासनाकडून निधी मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याचबरोबर स्मारकाला लागणाऱ्या अतिरिक्त जागेबाबत स्थानिक प्रशासनाचेही सहकार्य घेऊ, असेही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्मारकाच्या जागेची पहाणी करताना सांगितले.