महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, स्त्री शिक्षणाचे जनक, शेतकऱ्यांचे कैवारी, थोर समाजसेवक एवढीच महात्मा फुले यांची ओळख नाही. त्यांचं कार्यकर्तृत्व त्यापेक्षाही मोठं आहे समानता - सत्यासाठी देह झिजणारे बहुजनांचे उध्दारक, सत्यशोधक संस्थापक आणि थोर विचारवंत क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फुले जयंतीच्या पूर्व संध्येला फलटण येथील महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करीत जयंतीच्या कामाचा आढावा घेतला.
आधुनिक भारतातील समाज सुधारक ज्यांनी पुण्याला मुलींची पहिली शाळा सुरू केली ज्यांनी आपली पत्नी सावित्रीबाईला शिक्षण देऊन तिला समाजामध्ये शिकवण्यासाठी सुशिक्षित बनवले, आणि देशातील पहिली शिक्षिका असण्याचा मान प्रदान केला, समाजाचे दगड धोंडे आपल्या अंगावर घेत या राष्ट्राला शिक्षणाचे महत्त्व सांगितले, अशे थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले यांची आज जयंती आहे. अशा महान क्रांतिसूर्यास खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अभिवादन केले. यावेळी फुले प्रेमी उपस्थित होते.