काही तथाकाथित समाजसेवक गोरक्षणाच्या नावाखाली हिंदू - मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचं षडयंत्र रचण्याच काम करीत असुन या गावात पुसेसावळी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत सरडे गावची पुसेसावळी होवु दिली जाणार नाही असा इशारा ग्रामस्थानी मोर्चाव्दारे दिला आहे
वन जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या गोंडस नावाखाली छुपा हिंदू - मुस्लिमवाद निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या तथाकथित गोरक्ष समाजसेवकांच्या निषेधार्थ आज सरडे गांवातील शेकडो ग्रामस्थानी आज येथील तहसिल कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता मोर्चा दरम्यान मोर्चेकऱ्यांच्या वतीने तहसिलदार डॉ .आभिजीत जाधव यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
आज सकाळी भर उन्हात सरडे गांवातील ग्रामस्थांनी फलटणमधुन तहसिल कार्यालयावर धडक मोर्चा काढला तहसिल कचेरीवर मोर्चा धडकल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले यावेळी रामदास शेंडगे , सुखदेव बेलदार , माजी सरपंच दत्तात्रय भोसले , सलीम शेख , भाजपचे बजरंग गावडे , शत्रुघ्न जाधव . , शशीकांत धायगुडे आदीनी मोर्चा क यांना मार्गदर्शन केले मोर्चात महिला तरुण ग्रामस्य शेकडोच्या संख्येने सहभागी झाले होते.
हिंदू - मुस्लीम वाद निर्माण करण्याचा छूपा अजेंडा राबविणाऱ्या तथाकथित गोररक्षक समाजसेवकांवर कायदेशीर कारवाई करावी , या प्रमुख मागणींसह सरडे गावातील गट नंबर ६७९मधील नागरीकांची घरबांधकामे , सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे कायम करावीत , शेती महामंडळाची शिल्लक जमिन राज्य सरकारने केंद्राला दयावी आणि त्या मोबदल्यात गावातील गावठाणाला पर्यायी जागा म्हणुन उपलब्ध करून दयावी पर्यायाने अतिक्रमण नियमित करावे , या भागात पक्के रस्ते करण्यासाठी विनाअट परवानगी दयावी , वन विभागामार्फत सुरू असणारा सव्हें त्वरीत थांबविण्यात यावा आदी मागण्या ग्रामस्थांच्या वतीने या निवेदनात करण्यात आल्या आहेत. सरडे ( ता. फलटण ) येथील गट नंबर ६७९मधील १२ एकर क्षेत्रावर १४००- लोकसंख्या असणारी २००ते २५० कुटुंबे १९७२ साला पासुन वास्तव्य करीत आहेत
ग्रामपंचायतीला हे सर्व कुंटुबे सर्व प्रकराचा कर देतात मात्र वनविभागाने या जागेचा आता सर्वे सुरू करून लोकांच्यात भिती निर्माण केलयाचे या गावातीलसद्य चित्र असुन वन विभागाला व संबधीत शाससकीय प्रशासनाला खतपाणी घालणाऱ्यांचा शासनाने बंदोबस्त करावा ही मागणी आता जोर धरू लागली आहे.