संत रोहिदास चर्मकार विकास महामंडळातर्फे लाभ घेणारे चर्मकार,होलार,ढोर आणि मोची हे चार समाज आहेत.यातील होलार समाज पुर्वीपासूनच भूमीहीन आणि बेघर आहे.त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे.अशातच महामंडळाच्या कर्ज योजनेला असणारे शेतकरी जामीनदार व शासकीय नोकर जामीनदार अशी अट असल्याने होलार समाजातील गरजू लाभार्थ्यांना कोणीही जामीन मिळत नसल्याने महामंडळाच्या योजनांचा गरजू लाभार्थ्यांना लाभ घेता येत नाही.
ही त्रुटी लक्षात आल्याने फलटण तालुका होलार समाजाच्या वतीने संत रोहिदास चर्मकार विकास महामंडळाचे सातारा जिल्हा येथील कार्यालयात निवेदन देण्यात आले. त्याचबरोबर कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी जाचक अटी रद्द करून सदर लाभार्थ्यांच्या ८ अ घराचा उतारा याच्यावर सदर कर्ज प्रकरणाचा बोजा चढवून या प्रकरणाचा गरजू लाभार्थ्यांपर्यंत लाभ देण्यात यावा अशी विनंती केली.
यावेळी होलार समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक बबनराव करडे साहेब, फलटण तालुक्याचे मा.अध्यक्ष नारायण आवटे, होलार समाज यंग ब्रिगेड महाराष्ट्र राज्यचे सदस्य महेंद्र गोरे, अशोक आवटे, निखिल आवटे, दत्तात्रय आवटे, अंकुश आवटे आदी उपस्थित होते.