सातारा दि. 4 : सातारा शहरामध्ये 16 व 17 सप्टेंबर 2024 रोजी सार्वजनिक गणेश मंडळांचे गणपती विसर्जन केले जाते. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 कलम 34 अन्वये त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारान्वये दि. 16 सप्टेंबरच्या 6 वा. पासून 18 सप्टेंबरच्या सकाळी 7 वाजेपर्यंत सातारा शहरातील वाहतुकीमध्ये तात्पुरते बदल केले आहेत.
या बदलानुसार राजपथावर कमानी हौद - देवी चौक, मारवाडी चौक- मोती चौकापर्यंत येणारे जाणारे मार्ग सर्व वाहनांना प्रवेश बंद असेल. कमानी हौद ते शेटे चौकपर्यंत येणारे जाणारे मार्ग सर्व वाहनांना प्रवेश बंद. कर्मवीर भाऊराव पाटील पथावर शेटे चौक ते शनिवार चौक मार्गे मोती चौक पर्यंत येणाऱ्या व जाणाऱ्या मार्गावर प्रवेश बंद. मोती चौक - एम.एस.ई.बी. ऑफिस समर्थ टॉकिज - राधिका टॉकिज चौक ऐक्य प्रेस कॉर्नर - बुधवार नाका चौक- गणेश विसर्जन कृत्रीम तलाव कै. किसन बा. आंदेकर चौक, करंजे पेठ पर्यंत येणारे जाणारे मार्ग सर्व वाहनांना प्रवेश बंद. स्टेट बैंक प्रतापगंजपेठ (काटदरे मसाले दुकान ) - डि.सी.सी. बँक - मोती तळे पर्यंत येणारे जाणारे मार्ग सर्व वाहनांना प्रवेश बंद. मोळाचा ओढा ते बुधवार नाका मार्गावरील शाहूपुरी पोलीस ठाणे ते बुधवार नाका पर्यंत येणारे जाणारे मार्ग सर्व वाहनांना प्रवेश बंद असणार आहे. समर्थ मंदिर ते चांदणी चौक हा मार्ग अवजड वाहनांसाठी बंद राहील.
बोगदा ते शाहू चौक हा मार्ग जड वाहनांसाठी (एस.टी.बस सह) व अवजड वाहनांसाठी बंद राहील (सज्जनगड व कास पठार कडे जाणारी व येणारी जड वाहने (एस.टी.बस सह) व अवजड वाहने बोगदा, शेद्रे मार्गे जातील व येतील.
बोगदा, समर्थ मंदिराकडून चांदणी चौक मार्गे एस.टी. स्टॅन्ड साताराकडे येणारी सर्व वाहने (जड व अवजड वाहने वगळून) ही चांदणी चौक राजवाडा मार्गे न येता समर्थ मंदिर, अदालत वाडा शाहू चौक मार्गे एस.टी. स्टॅन्डकडे जातील. मोळाचा ओढाकडून सातारा शहरात येणारी सर्व वाहने ही मोळाचा ओढा, महानुभव मठ, करंजे, भूविकास बँक चौक मार्गे मार्गस्थ होतील. कोटेश्वर मंदिर - राधिका टॉकीज चौक, राधिका रोड मार्गे एस.टी. स्टॅन्ड कडे येणारी वाहने ही कोटेश्वर मंदिर - शाहुपुरी - मोळाचा ओढा मार्गे महानुभव मठ, करंजे, भूविकास बँक मार्गे एस.टी. स्टँडकडे येतील. मोती चौकाकडे जाणारी वाहने शाहु चौक अदालत वाडा मार्गे समर्थ मंदिर मार्गस्थ होतील. शेटे चौक, शनिवार चौक, जुना मोटार स्टॅन्ड मोती चौकाकडे जाण्यासाठी वाहतूक बंद असल्याने त्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी आपली वाहने पर्यायी मार्गाने घेऊन जावी. मोळाचा ओढा ते बुधवार नाका मार्गावरील शाहूपुरी पोलीस ठाणे येथे बुधवार नाका जाण्यासाठी वाहतूक बंद असल्याने परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी आपली वाहने शाहूपुरी अथवा पर्यायी मार्गाने घेऊन जावे.
वरील सर्व मार्गावर रुग्णवाहिका, पोलीस वाहने, अग्निशामक दलाची वाहने वगळून इतर सर्व वाहनांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
पार्किंगची व्यवस्था पुढील प्रमाणे करण्यात आली आहे. गणेश विसर्जन मार्गावर राहणाऱ्या नागरीकांनी आपली वाहने विसर्जन मार्ग सोडुन पर्यायी जागेत पार्क करावीत तसेच विसर्जन पाहण्यासाठी येणाऱ्या नागरीकांनी आपली वाहने तालिम संघाजवळील मैदान, गुरुवार परज, गांधी मैदान, कोटेश्वर मैदान या चार ठिकाणी अथवा आपल्या पर्यायी जागेत पार्किंग करावीत.