फलटण प्रतिनिधी :
फलटणच्या बहुचर्चित भुयारी गटर योजना शहराच्या विकासात भर टाकणारी असली तरी ती तयार करताना अनेक त्रुटी समोर आल्या होत्या. यापैकीच अक्षम्य अशी चूक कंत्राटदार व नियोजनातील अधिकारी यांचेकडून झाली होती .संपूर्ण शहरातील मल बाणगंगा नदीत आणले आहे यासाठी नदी पत्रात खूप मोठाले चेंबर तयार करण्यात आले आहे याने नदीच्या मूळ सौन्दर्याला बाधा आलीच आहे त्यातच यातील एक भला मोठा चेंबर फलटणकरांचे व मलटण करांचे श्रद्धास्थान असणारे बाणगंगा नदी काठचे श्री सिद्धिविनायक मंदिराच्या दरवाजा समोर बांधला होता
हे गणेश मंदिर नेहमीच भक्तांच्या गर्दीने भरलेले असते बाणगंगा नदी काठी छोटस पण टुमदार असणारे हे मंदिर फलटणच्या वैभवात भर घालते परंतू काही दिवसांपूर्वी मंदिराच्या अगदी समोर भुयारी गटर योजनेचा चेंबर बांधला होता त्यामुळे रस्त्यावरून होणारे गणेश दर्शन तर बंद झालेच होते भुयारी गटराचा चेंबर मंदिरा समोर बांधल्याने भक्त अतिशय नाराज होते
गणेश भक्तांच्या भावना लक्षात घेऊन धैर्य टाईम्सने दिनांक 1 मे रोजी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर फलटण पालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी जागेची पहाणी करून संबंधित चेंबर हटवला जाईल असे आश्वासन दिले होते आज या आश्वासनाची पूर्ती करताना सम्बधित ठेकेदार व पालिका यांनी हा चेंबर हटवला आहे या मुळे गणेश भक्तांनी आनंद व्यक्त करत धैर्य टाईम्सचे आभार मानले आहेत