धैर्य टाईम्स विशेष प्रतिनिधि -
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या आदेशानुसार विधानपरिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक कार्यक्रम विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जाहीर केली होती. यासाठी 19 डिसेंबर 2024 रोजी मतदान होणार असल्याचे त्यांनी सांगितले. विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल आहे.
माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सभापतीपद रिक्त झाले होते. या पदासाठी 19 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी 18 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर त्या अर्जांची छाननी होणार असल्याचे श्रीमती गोऱ्हे यांनी यावेळी जाहीर केले होते.