सातारा, दि. 18 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनचे अर्ज https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर भरण्यास 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त सुनिल जाधव यांनी दिली आहे.
सन 2024-2025 या वर्षातील नव्याने प्रवेशित व मागील वर्षी स्वाधार योजनेसाठी अर्ज केलेल्या रिनिवल विद्यार्थ्यांनीसुद्धा स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज भरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव समाज कल्याण कार्यालयामध्ये सादर करणे आवश्यक आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन पोर्टलद्वारे दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत आणि या प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेश मिळालेला नाही. अशा सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे आपोआप स्वाधार योजनेसाठी वर्ग होणार आहेत, अशा विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेसाठी नव्याने अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही, असेही श्री. जाधव यांनी कळविले आहे.