सातारा - 260 कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाची मतमोजणी 20 नोव्हेंबर रोजी पार पडली आहे. मतमोजणी अंती मतदान केंद्र 164 मध्ये मतदान यंत्रामध्ये एकूण मतदान 514 नोंदविलेले आहे. त्यापैकी डॉ. अतुलबाबा सुरेश भोसले यांना एकूण 357 इतके मतदान झाले आहे तर चव्हाण पृथ्वीराज दाजीसाहेब यांना 150 इतके मतदान झाले आहे. ही वस्तुस्थिती आहे, अशी माहिती 260 कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकरी यांनी दिली आहे.
समाजमाध्यमांमध्ये कोणीतरी अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणे चुकीची आकडेवारी प्रसिध्द केली आहे. प्रसारित होणा-या मजकुरामध्ये दर्शविण्यात आलेली मतदानाची आकडेवारी ही मतमोजणी प्रतिनिधी यांनी अनावधानाने दर्शविली असून ती पुर्णतः चुकीची आहे. कार्यालयाकडून प्रसिध्द करणेत आलेल्या मतमोजणी अहवालानुसार बरोबर आहे. तरी समाजमाध्यमांमध्ये प्रसिध्द होणा-या मजकुरावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असेही आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे.