फलटण - कोरेगाव विधान सभा मतदार संघात १ लाख ७२ हजार ९४० पुरुष, १ लाख ६६ हजार ७०८ स्त्रिया, १४ इतर असे एकूण ३ लाख ३९ हजार ६६२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यापैकी आज सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत 10141 पुरुष व 4434 महिलांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदानाच्या 4.29 टक्के मतदान झाल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.