फलटण | धैर्य टाईम्स | ९ डिसेंबर २०२४
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनने ट्रांसफार्मर चोरीचे अनुषंगाने फलटण शहरातील डीपी चोरी रेकॉर्ड वरील ५ जण रात्री संशयितरित्या मिळून त्यांच्याकडे अधिक तपास केल्यावर त्यांनी काही डीपी चोरी केलेची कबुली दिली असल्याची माहिती फलटण ग्रामीम पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी दिली.
याप्रकरणी संतोष जगन्नाथ घाडगे, किरण भीमराव घाडगे, सागर युवराज घाडगे, प्रशांत सुनील जुवेकर सर्व राहणार मलटण, फलटण व रोहिदास सोपान कदम राहणार चौधरवाडी ता. फलटण या पाचजणांना अटक केली आहे.त्यांना सात दिवस पोलिस कोठडी देण्यात आली आहे. त्यांचेकडून आणखीन गुन्हे उघड होणेची शक्यता असल्याची माहिती महाडिक यांनी दिली.
अजूनही डीपी चोरणारे गुन्हेगार टोळी आहेत त्याची माहिती काढणे सुरू आहे. तर तांबे खरेदी करणरे आणि चोरी करणाराचे नावे पोलीसांना कळवावे माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे आवाहन पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी केले आहे.
तालुक्यातील विविध गावातील ग्रामस्थांनी ज्यांची कनेक्शन डीपी वर आहेत त्यांनी जागृत राहून अचानक विज बंद झाल्यास अथवा रात्री नविन दुचाकी किंवा चारचाकी दिसल्यास ११२ या डायल नंबरला कळवावे तसेच ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर करावा व अनेक गावात ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर प्रभावी होत नाही काही गावाची यंत्रणा बंद आहे तरी ग्रामस्तानी सहकार्य करावे असे पो. नी. महाडिक यांनी कळविले आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक डॉ.वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली पो. निरीक्षक सुनील महाडीक, शिवाजी जायपत्रे, सपोनि, गुन्हे प्रकटीकरणचे पो.उप.नी गोपाल बदने, महादेव पिसे, नितीन चतुरे,तात्या कदम, अमोल जगदाळे, हनुमंत दडस यांनी केली.