फलटण : फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील संविधान समर्थन समिती पुरस्कृत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांनी ग्रामस्थांसमवेत गुणवरे येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघात बौद्ध समाजाला उमेदवारी मिळावी याकरिता संविधान समर्थन समितीकडून मोठी चळवळ उभारण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर प्रा.रमेश आढाव ही निवडणुकीत लढवीत आहेत.
ही निवडणूक सर्वसामान्यांच्या घटनात्मक हक्काची आणि विकासाची आपल्याला करायची होती ", असे सांगून "मतदारांनी घराबाहेर पडून मोठ्या संख्येने मतदान करावे", असे आवाहन प्रा.रमेश आढाव यांनी केले.