फलटण प्रतिनीधी : विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ अंतर्गत निवडणुक आयोगामार्फत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदारांमध्ये जनजागृती करण्याच्या अनुषंगाने २५५ फलटण (अ.जा) विधानसभा मतदारसंघामध्ये दि. ४ रोजी मा.निवडणुक निरीक्षक नुह पी. बावा (IAS) यांच्या प्रमुख उपस्थितीत मुधोजी हायस्कूल प्रांगणात मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मा.निवडणुक निरीक्षक नुह पी. बावा (IAS) यांनी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदानाचा हक्क बजावावा तसेच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारांनी घराबाहेर पडुन मतदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडावे असे आवाहन केले. यावेळी सहा. निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार डॉ. अभिजित जाधव यांनी २५५ फलटण (अ.जा.) विधानसभा मतदार संघामध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदान जनजागृतीचे विविध उपक्रम मा. निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी फलटण श्री सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी स्वीप नोडल अधिकारी सचिन जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले व २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान करणेबाबतची प्रतिज्ञा सर्वांना दिली. याप्रसंगी फलटण शहरातील बी.एल.ओ. पर्यवेक्षक व बी.एल.ओ. तसेच स्वीप टिम आणि मतदार मोठया संख्येने उपस्थित होते.