फलटण | धैर्य टाईम्स | १७ डिसेंबर २०२४
ग्रामपंचायत सुरवडीच्या (ता..फलटण) उपसरपंचपदी येथील सुर्यकांत भानुदास पवार यांची आज ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये बिनविरोध निवड करण्यात आली. माजी उपसरपंच विजय खवळे यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंचपदी सूर्यकांत पवार यांची निवड करण्यात आली. तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. भानुदास पवार यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुरवडीच्या सरपंच शरयू साळुंखे - पाटील, निरीक्षक मंडलाधिकारी व्ही. व्ही. गाडे तर सचिव म्हणून ग्रामसेवक एस. जी. माने यांनी काम पाहिले यावेळी माजी सरपंच जितेंद्र साळुंखे पाटील, माजी उपसरपंच बाळासो जगताप, विजय खवळे, पोलीस पाटील संतोष पवार, माऊली कृपा पतसंस्थेचे चेअरमन मोहन पवार, ग्रामपंचायत सदस्य लीना जाधव, संगीता जगताप, सुषमा नलवडे, ज्योती जगताप, नीता गाडे, रेखा गोरे, महेश साळुंखे पाटील, नितीन जाधव, बापूराव माडकर ग्रामपंचायत चे सर्व कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
संबंधित बातम्या
![Avi 8087403403](https://dhairyatimess.com/upload/advt/ADVT050_300X200.jpg)