फलटण | धैर्य टाईम्स |
श्वास बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन याठिकाणी इंग्लिश स्पिकिंगचे मोफत वर्ग सुरु करण्यात आले आहेत. यावेळी सेवानिवृत्त वॉरंट ऑफिसर जे. एस. काकडे, सेवानिवृत्त प्रा. शिवाजी सावंत, प्रा. एम. टी. ढोले, धैर्य फौंडेशनचे अध्यक्ष सचिन मोरे, माजी नगरसेवक सचिन अहिवळे, ॲड. मेघा अहिवळे, सनी काकडे, सुनिल अब्दागिरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
इयत्ता सातवी पासून पुढील विद्यार्थीना इंग्लिश स्पिकिंग कोर्ससाठी मोफत प्रवेश देण्यात आला आहे. विध्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून पहिली बॅचची प्रवेश मर्यादा संपली आहे. समाजामधील येणारी नवीन पिढी शिक्षणा बरोबरच इतर क्षेत्रामध्ये यशस्वी व्हावी यासाठी श्वास बहुउद्देशीय विकास संस्था कार्यरत राहणार आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले.
संस्थेचे सदस्य मंगेश सावंत, कपिल काकडे, चंद्रकांत मोहिते, मुकेश अहिवळे, शुभम अहिवळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.