फलटण - कोरेगाव विधान सभा मतदार संघात १ लाख ७२ हजार ९४० पुरुष, १ लाख ६६ हजार ७०८ स्त्रिया, १४ इतर असे एकूण ३ लाख ३९ हजार ६६२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यापैकी आज दुपारी १ वाजेपर्यंत 62228 पुरुष व 52614 महिलांनी तर 5 इतर यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.एकूण मतदानाच्या 33.79 टक्के मतदान झाल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.