">सातारा दि.7: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने 85 वर्षावरील वृध्द व 40 टक्के पेक्षा दिव्यांग असे जे मतदार केंद्रावर मतदान करण्यासाठी उपस्थिती राहू शकत नाहीत त्यांना गृह भेटीतून मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. हा पर्याय ऐच्छिक असून त्यासाठी मतदारांचा नमुना 12 ड मध्ये मागणी अर्ज घेण्यात आला होता. 256 वाई विधानसभा मतदार संघामध्ये 85 वर्षावरील 128 वृध्द व 20 दिव्यांग मतदार यांनी गृहभेटीद्वारे मतदानाचा पर्याय निवडला होता. यापैकी ४ मयत असून ५ मतदार घरी आढळले नाहीत . त्यांना मतदानासाठी पुढील तारीख देण्यात आली आहे. १३९ मतदारांचे गृहभेटीद्वारे दि.7 नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात आले आहे. मतदान पथकाने या मतदारांच्या घरी भेट देऊन ही प्रक्रिया पूर्ण करून घेतली. या सर्व प्रक्रीयेचे मतदानाच्या गोपनियतेचा भंग होणार नाही या पध्दतीने चित्रीकरण करण्यात आले आहे.