फलटण | धैर्य टाईम्स |
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फलटण येथे आमदार सचिन पाटील यांनी अभिवादन केले.यावेळी मा. नगरसेवक सचिन अहिवळे, सामाजिक कार्यकर्ते अमीरभाई शेख, राजेश हेंद्रे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फलटण येथे आमदार सचिन पाटील यांनी अभिवादन केले.
यावेळी मा. नगरसेवक सचिन अहिवळे, सामाजिक कार्यकर्ते अमीरभाई शेख, राजेश हेंद्रे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी रिपाइंचे मधुकर काकडे पश्चिम महाराष्ट्र संघटक, विजय येवले जिल्हा सचिव, राजू मारुडा जिल्हा उपाध्यक्ष, मुन्ना शेख जिल्हा सेक्रेटरी, संजय निकाळजे जिल्हा कार्यकारणी सदस्य, सतीश अहिवळे अध्यक्ष फलटण तालुका, लक्ष्मण अहिवळे अध्यक्ष फलटण शहर आदी पदाधिकारी कार्यकर्ते यांनीही यावेळी अभिवादन केले.
समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, विचारवंत, राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भीमराव आंबेडकर यांनी ६ डिसेंबर १९५६ रोजी अखेरचा श्वास घेतला. हाच दिवस भारतात महापरिनिर्वाण दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला.