फलटण प्रतिनिधि : फलटणमधील सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून प्रचार फेरीत वाद्यांसह मोठ्या प्रमाणात गाड्या, वेगवेगळ्या आकाराच्या मफलर, झेंडे, बेंच, रथ व अन्य साहित्याचा वापर केला जातो. प्रचारात वापरण्यात येणाऱ्या साहित्याचा दर निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे प्रचारफेरीत किती साहित्य वापरले गेले, त्यासाठी आलेला खर्च याची नोंद निवडणूक आयोगाकडून ठेवली जात आहे. मात्र सध्या होत असलेल्या प्रचार सभेकरिता अनेक वाहने विना परवाना वाहने वापरली जात असल्याची चर्चा असून यावर निवडणूक आयोगाकडून कारवाई होणार का? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
सध्या फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघात चुरस वाढत असून विविध पक्षांकडून मोठया नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यात येत आहे. सभेला आणली जाणारी माणसे विविध वाहणातून आणली जात आहेत मात्र अशी वाहने सभेच्या ठिकाणापासून दूर लावली जातात. प्रत्यक्षात शेकडो वाहनांची अधिकृत नोंद होत नसल्याची माहिती मिळत असून राजकीय पक्ष लाखो रुपयांचा खर्च लपवत असल्याचे दिसते आहे. अशा वाहनांवर निवडणूक आयोगाकडून कारवाई होणार का हाच प्रश्न आता समोर येऊ लागला आहे.
सभेला आणली जाणाऱ्या माणसांना विविध हॉटेल व धाब्यावर जेवणावळी सुरु आहेत. अनेक ठिकाणी ओल्या पार्ट्या तालुक्यातील विविध गावात सुरु आहेत याच्यावर निवडणूक आयोगाकडून कारवाई होणे गरजेचे असून निवडणूक निर्णय अधिकारी कोणती ऍक्शन घेणार हे पाहणे आता औस्तुक्याचे ठरणार आहे.