फलटण - सध्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमी तालुक्यात मोठी राजकीय खळबते होताना दिसत आहेत. अशातच विविध नेते कार्यकर्ते आपला पक्ष गट तट सोडून मोठे राजकीय परिवर्तन होताना दिसत आहे.
आज विडणीमध्ये माजी खासदार व सरपंच गटाला खिंडार पडले. विडणीतील विठ्ठलराव नाळे, माजी पंचायत समिती सदस्य, शरदराव नाळे, माजी ग्रामपंचायत सदस्य, अंकुशराव नाळे, मा. चेअरमन विडणी विकास सोसायटी
सतीशराव घाडगे , धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते, पंकजराव नाळे, धडाडीचे युवा कार्यकर्ते यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा माजी खासदार गटातून राजे गटामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची उपस्थिती होती.