फलटण :
फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार दिपक प्रल्हाद चव्हाण यांच्या प्रचाराचा समारोप भव्य प्रचार सांगता रॅलीने होणार आहे.
रॅली सोमवार दि. 18 नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी श्रीराम मंदिर फलटण येथून मार्गस्थ होणार आहे. फलटण येथील श्रीराम मंदिर येथून गजानन चौक – तेली गल्ली – मारवाड - - पेठ – शुक्रवार पेठ – शंकर मार्केट श्रीराम चौकी – पाचबत्ती चौक - रविवार - पेठ – शिवशक्ती चौक – उमाजी नाईक चौक – डेक्कन चौक – महात्मा फुले चौक अशा मार्गाने जाऊन श्रीमंत मालोजीराजे महाराज साहेब यांच्या पुतळ्याच्या येथे रॅलीची सांगता होणार आहे.
फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रीय काँग्रेस पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व आम आदमी पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून दीपक प्रल्हाद चव्हाण यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार सांगता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.